आत्मदहनाचा प्रयत्न; प्रशासनात खळबळ
गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंजूरपूर येथील शेतकरी दीपक भागीनाथ बोर्डे यांनी रस्त्याच्या वादातून त्रस्त होऊन मंगळवारी गंगापूर तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली.
तहसीलदारांच्या दालनातच त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना तात्काळ बाजूला केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंजूरपूर येथील दीपक भागीनाथ बोर्डे यांच्या राहत्या घराजवळून शेतात जाणारा रस्ता काही दिवसांपासून बंद करण्यात आल्याचा आरोप आहे.
संबंधित रस्ता रघु अण्णा बोर्डे यांनी बंद केल्याने शेतात ये- जा करण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग उरलेला नसल्याचे दीपक बोर्डे यांनी सांगितले. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली असून कुटुंबासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी न्याय मिळावा तसेच बंद करण्यात आलेला रस्ता तातडीने खुला करण्यात यावा, यासाठी दीपक बोर्डे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून तहसील कार्यालयात वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला होता. प्रशासनाकडे निवेदने देणे, अधिकाऱ्यांची भेट
घेणे, सुनावणीसाठी उपस्थित राहणे अशा विविध माध्यमातून त्यांनी आपली बाजू मांडली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने ते मानसिक तणावात असल्याचे बोलले जात आहे.
मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास दीपक बोर्डे हे तहसील कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या दालनात प्रवेश करून सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून घेतले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कार्यालयात उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत त्यांना रोखले व पेट्रोलची बाटली बाजूला घेतली.
त्यामुळे कोणतीही कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची चर्चा
या घटनेमुळे गंगापूर तहसील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. वेळेत प्रश्न निकाली न निघाल्यास नागरिक टोकाची भूमिका घेत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
-- प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह --
याचबरोबर पेट्रोल डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर बाटलीत पेट्रोल सहज उपलब्ध झाले कसे? हा प्रश्नही आता चर्चेचा विषय ठरला आहे. रस्त्याच्या वादासाठी युवकाने पेट्रोलचा मार्ग निवडावा लागतो, यावरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मोठी दुर्घटना घडली नाही. घटनेनंतर तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी दीपक बोर्डे यांची समजूत काढत त्यांच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
तसेच पुढील सुनावणीच्या तारखेला संबंधित प्रकरणाचा निर्णय देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सुदैवाने या प्रकारात दीपक बोर्डे यांना कोणतीही इजा झाली नसून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
















